December 10, 2025
Blog इंदापूर ग्रामीण

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार

  • June 3, 2025
  • 0

शासनाच्या निर्णयानुसार लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान होणार आहे असे सूत्रांच्या माहितीनुसार कळते त्यानुसार आता इच्छुकांची भाऊ गर्दी वाढू लागली  आहे. अनेक दिवसापासून न झालेली जिल्हा

शासनाच्या निर्णयानुसार लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे मतदान होणार आहे असे सूत्रांच्या माहितीनुसार कळते त्यानुसार आता इच्छुकांची भाऊ गर्दी वाढू लागली  आहे.

अनेक दिवसापासून न झालेली जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाची निवडणूक सप्टेंबर ऑक्टोबर च्या दरम्यान होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे अनेक जण आपापल्या पद्धतीने प्रत्येक पक्षामध्ये प्रयत्न करताना दिसत आहेत प्रत्येक जण इच्छुक आहे परंतु प्रत्यक्ष मतदारराजा कोणाला स्वीकारतो हे सुद्धा पाहणे तितकेच महत्त्वाचे होणार आहे .

आता जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या नवीन गट रचनेनुसार इंदापूर तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गण निर्माण झाले आहेत या रचनेनुसार प्रत्येक गटामध्ये इच्छुकांची गर्दी दिसून येते.              वडापुरी माळेवाडी या नवीन जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये  अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येत आहे त्यामध्ये प्रामुख्याने  कर्मयोगी सहकारी कारखान्याचे संचालक रवींद्र सरडे, मोहन खबाले मनोहर भोसले, अमोल इंगळे, दिलीप पाटील, सतीश पांढरे, वडापुरी गणातून निराभिमा सहकारी कारखान्याचे संचालक महेश शिर्के, गोपीचंद गलांडे हे सुद्धा इच्छुक आहेत प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने कोणकोणत्या पक्षांमध्ये किती जण इच्छुक आहेत हे दिसून येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *