भारतीय जनता पक्षाने पुणे जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पुणे दक्षिण जिल्हाध्यक्षांचे नाव अखेर जाहीर केले. पुणे दक्षिण (बारामती) जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून श्री शेखर जी वडणे यांची नियुक्ती करण्यात आली.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
नवनियुक्त जिल्हाध्यक्ष शेखरजी वडणे यांची कामाची पद्धत पुणे जिल्ह्यातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहित आहे. परंतु परिचित नसलेल्या कार्यकर्त्यांना आज त्यांच्या कामाचा प्रत्यय आला. माननीय श्री शेखर वढणे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष यांची इंदापूर मध्ये सहर्ष स्वागत देशपांडे हॉटेल येथे फेटा श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला पार्टीच्या वतीने श्री तेजस देवकाते अध्यक्ष पश्चिम मंडल श्री राजकुमार जठार अध्यक्ष मध्य मंडल श्री राम आसबे अध्यक्ष पूर्व मंडल श्री किरणजी गानबोटे अध्यक्ष शहर श्री गजानन वाकसे साहेब ओबीसी पुणे जिल्हाध्यक्ष श्री माऊली काका चवरे श्री प्रदेश कार्यकारिणी सदस्य मारुती अण्णा वनवे श्री आकाजी कांबळे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा सरचिटणीस श्री बाळासाहेब पानसरे जिल्हा उपाध्यक्ष श्री भाजपचे युवा नेते जोतीराम कुर्डे श्री सचिन सावंत श्री गणेश गवळी श्री दादा नायकुडे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी वतीने सत्कार करण्यात आला व मीटिंग झाली. यावेळी इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष श्री शेखर वडणे यांनी सांगितले की भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसांचा सर्वसामान्य माणसासाठी कार्य करणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये कोणत्याही प्रकारचा जातिभेद धर्मभेद न करता सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष तळागाळातील वाडी वस्तीवरील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपण सर्वांनी मिळून हातामध्ये घेतले पाहिजे.
आता महायुतीचे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. आदरणीय फडणवीस साहेबांचे सरकार ही सर्वसामान्यांसाठी काम करत असून या सरकारच्या सर्व योजना तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. अनेक लोक कल्याणकारी योजना महायुती सरकार राबवत असून या सर्व योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे समर्पित भावाने काम करतो त्या कार्यकर्त्याला पक्ष नक्कीच न्याय देत असतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील मी आज जिल्हाध्यक्ष या पदी नियुक्त झालेलो आहे. हे केवळ फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं. भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी देणारा पक्ष आहे.
आपण सर्वांनी प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी पक्षाचे कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला आपला बूथ हा मजबूत करणं आवश्यक आहे. बूथ लेवलला पक्ष संघटना मजबूत करणे प्रत्येक कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. या सर्व कार्यामध्ये मी आपल्या सर्वांसोबत आहे.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष म्हणाले की पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली तरी देखील पक्षासोबत निष्ठावंत असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींची नक्कीच आहे.
भाजपा हा सर्व महापुरुषांना आदर्श मानून कार्य करणारा पक्ष आहे. सर्व महापुरुषांच्या जयंती उत्सव आपल्या आपल्या प्रभागांमध्ये बूथ लेवलला साजरे करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्षांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिल्या.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करत असताना कोणत्याही प्रकारचा बडेजाऊ पणा न करता हार तुरे न आणता एक पुस्तक भेट देऊन किंवा एक वृक्ष लावून वाढदिवस साजरा करावा. आपला वाढदिवस हा पर्यावरण पूरक साजरा करण्याचा संकल्प आपण सर्वजण करूया.
भारतीय जनता पक्ष आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या सर्व निवडणुका ताकतीने लढणार आहे. या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ रचना मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मारुती अण्णा वनवे, पुणे जिल्हा ओबीसीमोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे, प्रदेश कार्यकारणी सदस्य माऊली काका चवरे, पुणे दक्षिण सरचिटनीस आकाशजी कांबळे, इंदापूर पूर्व मंडल अध्यक्ष राम आसबे, पश्चिम मंडल अध्यक्ष तेजस देवकाते, मध्य मंडल अध्यक्ष राजूकुमार जठार, व इंदापूर शहराध्यक्ष किरणजी गानबोटे यांनी उपस्थित पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब पानसरे, सचिन सावंत , ज्योतीराम कोरडे गणेश गवळी, दादा नायकुडे इंदापूर युवा मोर्चाचे मा.अध्यक्ष ॲड.मयूर शिंदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.